पहिला खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला-पुरुष संघाची केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतली भेट... जळगाव प्रतिनिधी (संपादक -:...
पहिला खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला-पुरुष संघाची केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतली भेट...
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भारतात पहिल्यांदाच खेळवण्यात आलेल्या खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय महिला-पुरुष असं दोन्ही खो-खो संघांनी आपल्या कमालीच्या खेळ कौशल्याच्या जोरावर,दमदार व ऐतिहासिक कामगिरी करत विश्वचषक जिंकला होता.
आज दिल्ली येथे खो-खो विश्वचषक २०२५ विश्वविजेते भारतीय महिला-पुरुष संघातील खेळाडूंनी केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी भेट घेऊन संवाद साधला.यावेळी त्यांनी या विजयाच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळणार, नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याचे सांगून.तमाम भारतवासियांना आपल्या खेळाडूंचा सार्थ अभिमान असून सर्वांचं मनापासून अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




No comments