घोडगाव येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर आयोजित चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) आज दि.४ जानेवारी २०२५ शनि...
घोडगाव येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर आयोजित
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
आज दि.४ जानेवारी २०२५ शनिवार रोजी घोडगाव ता.चोपडा येथे,नामदार गुलाबराव पाटील सोशल फाउंडेशन पाळधी तथा संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल(नवी मुंबई)आधारस्तंभ व प्रेरणास्थान कार्यसम्राट आमदार प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिरास अनेर परिसरातील
वेळोदे,घोडगाव,कुसुंबे,वढोदा,वाळकी या गावातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन लाभ घेतला.या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ४६ पेशंट ऑपरेशन साठी पनवेल नवी मुंबई येथे रवाना करण्यात आले.या शिबिराचे आयोजक सुनील कोळी,मुकेश कोळी,गोपाल भोई,अक्षय पारधी,किरण भोई,डॉ बी आर पाटील,नितीन जैन,डॉ कोळी दादा,अशोक पवार वेळोदे तसेच भूपेंद्र वाघ,जयेश भोई,डॉ.राहुल चौधरी,डॉ.राहुल पाटील यांच्या टीम सह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
No comments