एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिनाचे आयोजन तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण झाल्याने पोलीस ठाण्यात उत्साहाचे वातावरण अहिल्यानगर (दि.१८ प्र...
एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिनाचे आयोजन
तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण झाल्याने पोलीस ठाण्यात उत्साहाचे वातावरण
अहिल्यानगर (दि.१८ प्रतिनिधी):-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार दिनाचे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक शनिवारी करण्यात आलेले असून यामध्ये नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणे असल्याचे दिसून आले.यावेळी विविध तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या तक्रारीचे व्यवस्थितपणे निवारण करण्यात आले.या उपक्रमामुळे आपापसातील तक्रारी वाद विवाद कमी होण्याचे प्रमाण दिसेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यावेळी केले.यावेळी तक्रारदारांचे तक्रारीचे निवारण झाल्याने त्यांच्यात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि. माणिक चौधरी आदी कर्मचारी उपस्थित होते.
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत नागरिकांच्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन MIDC पोलीस स्टेशन येथे
मा. पोलीस अधीक्षक साो.अहिल्यानगर
मा. अपर पोलीस अधीक्षक साो. अहिल्यानगर यांचे उपस्थितीत आज दि. १८/०१/२०२५ रोजी ११:००ते १४:०० वा दरम्यान करण्यात आलेले आहे.तक्रार निवारण दिना दरम्यान विविध तक्रारदार यांचे तक्रारीचे निवारण करण्यात आले.
मा. सविनय सादर
माणिक बी. चौधरी
सहा.पोलीस निरीक्षक
MIDC पोलीस स्टेशन.

No comments