रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शहर वाहतूक शाखेकडून जनजागृती रॅली अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) शहर वाहतुक नियंत...
रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शहर वाहतूक शाखेकडून जनजागृती रॅली
अहिल्यानगर (दि.१७ प्रतिनिधी):-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
शहर वाहतुक नियंत्रण शाखा यांचे कडून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत ११ जानेवारी २०२५ ते १७ जानेवारी २०२५ दरम्यान अहिल्यानगर शहरातील अहमदनगर कॉलेज,न्यु आर्ट्स कॉलेज,प्रेमराज सारडा महाविद्यालय,समर्थ विद्यालय,मेहर इंग्लिश स्कूल,आनंद विद्यालय, जय बजरंग विद्यालय येथील विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रैली काढण्यात आली होती. हि रॅली कोठीचौक, चांदनी चौक,नीलक्रांती चौक,दिल्लीगेट, पटवर्धन चौक, चितळेरोड,गांधी मैदान, गुलमोहर रोड, पाईपलाईनरोड या परीसरातून नेण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना माहितीदर्शक फलके वाटप करुन वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे, वाहन चालवताना मोबाईलवर न बोलने,सिटबेल्टचा वापर करणे तसेच अपघातातील जखमींना तातडीने करावयाच्या प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अपघातग्रस्तांसाठी असलेल्या रुगणवाहिका, पोलीसांच्या कार्यपध्दतीची माहिती देण्यात आली.तसेच माळीवाडा व तारकपूर बसस्थानक परीसरात नाकांबंदी दरम्यान ज्यांनी वाहन चालवताना हेल्मेटचा व सिटबेल्टचा वापर केला आहे त्यांना गुलाब पुष्प देवून अभिनंदन केले.तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांबाबत मार्गदर्शन करुन आपले परिवारातील सदस्यांना वाहतुक नियम पाळणे बाबत सांगण्यात यावे असे कळविण्यात आले.या सदर रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात जवळपास २५०० ते ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या कार्याक्रमा प्रसंगी शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे,पोसई.परदेशी, पोसई गायकवाड,पोसई. घायतडक,पोसई.बोटे, सफो.मन्सुर सय्यद, पोहवा.कर्डीले , पोकॉं.ससे,पोकॉं. गव्हाणे व पोकॉं. खराडे इत्यादी उपस्थित होते.

No comments