२००४ ते २०१४ हा देशासाठी सुवर्ण काळ..! चोपडा येथे माजी पंतप्रधान (स्व)डॉ. मनमोहन सिंग यांना सर्व पक्षीय नेत्यांकडून शोकसभेत प्रतिपादन ..! ...
२००४ ते २०१४ हा देशासाठी सुवर्ण काळ..!
चोपडा येथे माजी पंतप्रधान (स्व)डॉ. मनमोहन सिंग यांना सर्व पक्षीय नेत्यांकडून शोकसभेत प्रतिपादन ..!
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा :-- भारताचे १४ वे माजी पंतप्रधान(स्व)डॉ.मनमोहन सिंग यांना आज दि.४ रोजी शहरातील अमरचंद सभागृहात सर्व पक्षीय नेत्यांकडून आदरांजली वाहून शोकसभा आयोजित करण्यात आली होती.या शोकसभेत सर्व पक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली व्यक्त करीत
(स्व)डॉ.मनमोहन सिंग बद्दल विचार प्रकट केले.यावेळी(स्व)डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे काम केले.देशाने एक उत्कृष्ट अर्थ शास्त्रज्ञ गमाविला.१९८४ मध्ये ते गव्हर्नर झालेत.२००४ ते २०१४ हा देशासाठी सुवर्ण काळ असल्याचे माहिती सर्व पक्षीय नेत्यांनी दिली.यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील,चोसाका माजी अध्यक्ष ॲड.घनःश्याम पाटील,गोरख पाटील,माजी बाजार समिती सभापती सुरेश पाटील,तापी सूतगिरणी संचालक के डी चौधरी,माजी नगरसेवक राजू देशमुख,माजी सभापती गिरीश पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील,डॉ चंद्रकांत बारेला,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,संजीव बाविस्कर,काँग्रेस तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे,चोपडा शहर अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक नंदकिशोर सांगोरे,माजी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,माजी शेतकी संघ चेअरमन शेखर पाटील,भाजपा अध्यक्ष नरेंद्र पाटील,तापी सूतगिरणी संचालक ॲड.एस डी पाटील,आदी उपस्थीत होते.सर्व पक्षीय शोक सभेत बोलतांना सांगितले की,२००८ मध्ये जागतिक मंदी होती त्याच्यातून देशाला सावरण्याचे काम
डॉ.मनमोहन सिंग यांनी केले.लोकशाही भक्कम करणारे नेतृत्व होते.निष्ठावान प्रामाणिक व्यक्ती साधी राहणी असलेले व्यक्तिमत्व देशाने गमाविले असल्याचं मत व्यक्त केले
नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते.राजकारणात नसलेला माणूस त्यांच्या कर्तुत्वावर पंतप्रधान पदापर्यंत पोहचले.दृढ निच्छयी असलेला पंतप्रधान देशाने गमाविला.इतिहास त्यांच्या कामाची साक्ष देईल.आय ए एस नसूनही पहिले अर्थ सचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. "अर्थ पुरुष" म्हणून त्यांची ओळख होती,१९९१ पासून त्यांनी उदारीकरण धोरणास सुरुवात केली.मधल्या काळात अर्थ व्यवस्था विस्कळीत झाली होती ती सुरळीत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.पंतप्रधान असतांना त्यांनी ७० हजार
कोटींचे कृषी कर्ज माफ केले होते
यावेळी शोक सभेत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील,ॲड.घनःश्याम पाटील,संजीव बाविस्कर,व्हि.के पाटील,के डी चौधरी,प्रदीप पाटील,चंद्रशेखर पाटील,जहीर भाई आदींनी मनोगत व्यक्त केले.संचलन नंदकिशोर सांगोरे यांनी केले.यावेळी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
No comments