वाशीम येथे स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत रोग तपासणी शिबिर संपन्न. वाशिम प्रतिनिधी . (संपादक-:- हेमकांत गायकवाड...
वाशीम येथे स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत रोग तपासणी शिबिर संपन्न.
वाशिम प्रतिनिधी .
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
वाशिम येथे स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत रोग निदान तपासणी शिबिर २६ जानेवारी २०२५ प्रजासत्तक दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वाशीम येथील सुप्रसिद्ध डॉ. प्रसाद नागपूरकर साहेब यांनी यावेळी रुग्णांची मोफत तपासणी केली. या शिबिरात अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे आयोजन स्व.लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. जगदीश मानवतकर सर यांनी केले होते.
सविस्तर वृत्त असे की ,अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षापासून अग्रेसर आणि कार्यरत असलेली स्व.लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्था वाशिम च्या वतीने मोफत रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन दि २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते . या शिबिरामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष श्री. संजय वैरागडे साहेब तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर प्रसाद नागपूरकर यांची उपस्थिती होती.
तर प्रमुख पाहुणे सौ.सुमनबाई लक्ष्मण मानवतकर सचिव स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहूदेशिय संस्था, आर के पाटोळे साहेब ( जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मातंग संघ) , अरुण शेळके पाटील ( समाजसेवक) संविधान भाऊ ढोले ( ऑल इंडिया टायगर सेना विदर्भ संघटक) , सुरेश खरात साहेब (बहुजन भारत पार्टी जिल्हा प्रभारी हिंगोली ) , प्रदीप सरकटे साहेब , लखन खंदारे, संदीप सुतार , अक्षय इंगोले , संजय भाऊ पूंडसे ,अरुण कंकाळ, रवी ठोके यांची उपस्थिती लाभली .
यावेळी आम्लपित्त , केस गळणे, डोकेदुखी , अंगदुखी, पोट दुखी, त्वचाचे विकार, कंबरदुखी, गुडघेदुखी , व्यसन मुक्ती इ. प्रकारच्या रुग्णांवर मोफत तपासणी आणि नीदान करण्यात आले. यावेळी जगदीश मानवतकर यांनी उपस्थित पाहूण्याचे स्वागत केले . तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मुंडे सर यांनी तर आभार प्रदर्शन सौ.वंदनाताई भगत( सदस्य स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्था वाशिम) यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व. लहानुजी नारायण मानवतकर बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य आणि सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.




No comments