adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

न्हावी येथे पत्रकार दिनी जि.प.मराठी मुलांच्या शाळेत पत्रकारांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

न्हावी येथे पत्रकार दिनी जि.प.मराठी मुलांच्या शाळेत पत्रकारांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जि प मराठी मुलांच्या शाळेत विद्या...

न्हावी येथे पत्रकार दिनी जि.प.मराठी मुलांच्या शाळेत पत्रकारांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
जि प मराठी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपा प्रसंगी शरद महाजन, नितीन चौधरी, देवेंद्र चोपडे, मीना तडवी, चंद्रशेखर पाटील व पत्रकार बांधव.


इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मराठी पत्रकार सृष्टीचे जनक, दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त न्हावी येथील जि प मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष तंत्र व वैद्य शिक्षक मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन होते .उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. नंतर मान्यवरांचा पत्रकारांकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात शरद महाजन यांनी आपल्या मनोगतात लोकशाही बळकट ठेवण्यासाठी प्रसारमाध्यमांची महत्त्वाची भूमिका असते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटनांवर लक्ष ठेवून समाजासमोर आदर्श घडवितात तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासात सातत्य ठेवून नेहमी वाचन करून भविष्यात आपले ध्येय निश्चित करावे असे प्रतिपादन करून जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन पत्रकार सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खारीचा वाटा उचलत आहेत त्याबद्दल त्यांनी पत्रकारांचेही तोंड भरून कौतुक केले. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी , मुख्याध्यापिका मीना तडवी, स्वप्ना तायडे, जि प मराठी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील,बिपिन कुमार वैद्य, राजश्री चौधरी, तसेच येथील पत्रकार पी के चौधरी, संतोष बारी, रवींद्र कोलते, संजय बारी, यांचेसहीत विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार पत्रकार ललित फिरके यांनी केले.

No comments