adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दगडाने ठेचून तरुणाचा खुन करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी केले अवघ्या १२ तासाच्या आतच जेरबंद

  दगडाने ठेचून तरुणाचा खुन करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी केले अवघ्या १२ तासाच्या आतच जेरबंद सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक हेमकांत गायकव...

 दगडाने ठेचून तरुणाचा खुन करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी केले अवघ्या १२ तासाच्या आतच जेरबंद


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक हेमकांत गायकवाड)

अहील्यानगर (दि.११ जानेवारी):-बोलेगाव फाटा येथे दगडाने तरुणाचा खून करून पसार झालेले आरोपीस पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे हे कारवाई पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत केली आहे. यातील मयत यांची पत्नी सदरील घडलेल्या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे दोन पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून आरोपी पकडण्यास रवाना केले. गुन्हा घडल्या त्या ठिकाणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना सपोनी. माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरील गुन्हा हा भास्कर विठ्ठलराव देशमुख रा. वाळुंज ता. जि. अहिल्यानगर याने केला असून तो सध्या आष्टी जि.बीड येथे आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने बीडमध्ये जाऊन आरोपीचा सीताफिने तपास करत आरोपीला अटक केली. पकडलेले आरोपीस गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की मयत अश्विन कांबळे यांनी दारू पिऊन शिवीगाळ केल्याने मी त्याच्या डोक्यात दगड घालून त्यास जीवे ठार मारले आहे अशी कबुली दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग संपतराव भोसले,यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि. माणिक चौधरी,पोउनि. विनोद परदेशी,पोउनि.विकास जाधव,पोउनि.मनोज मोंढे,पोहेकॉ.नंदकिशोर सांगळे,नितीन उगलमुगले,साबीर शेख, कावरे,राजू सुद्रिक, महेश बोरुडे,किशोर जाधव,सुरज देशमुख, जयसिंग शिंदे,नवनाथ दहिफळे,उमेश शेरकर, अक्षय रोहकले,सानप, गवारे, तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ. राहुल गुंड यांनी केली आहे.

No comments