तालुकास्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश. चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड...
तालुकास्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे घवघवीत यश.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
दिनांक १४/०१/२०२५ रोजी “महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित” कै. दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील. कला,शास्त्र,वाणिज्य महाविद्यालयाने राष्ट्रीय भूगोल दिनानिमित्ताने तालुकास्तरीय भौगोलिक पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा आयोजित केलेली होती त्यात एकशे तिस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला होता त्यात
“महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित” श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्युत विभागातील विद्यार्थिनी पूर्वा विलास राणे या विद्यार्थिनीने पारितोषिक प्राप्त केले त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री व्ही एन बोरसे व सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक यांनी तिचा सत्कार केला व कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments