पिंपरूड येथील दिव्यांगांच्या स्पर्धेतील बक्षीस वितरण व दिव्यांग बांधवांना साहित्य वितरण _प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत पत्रक...
पिंपरूड येथील दिव्यांगांच्या स्पर्धेतील बक्षीस वितरण व दिव्यांग बांधवांना साहित्य वितरण
_प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत पत्रकार दिन उत्साहात साजरा_
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
पिंपरूड येथे दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या राहुल कोल्हे सामाजिक मित्र परिवार वतीने दरवर्षी प्रमाणे सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. व या जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रांताधिकारी व तहसिलदारांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने विविध दिव्यांग बांधवांना साहित्य देखील वितरण करण्यात आले.
पिंपरूड ता. यावल येथील दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय या संस्थेच्या वतीने सोमवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बबनराव काकडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, तलाठी श्वेता ससाने, ग्रामसेवक बाळु वायकोळे, पोलीस पाटील हरीश चौधरी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फैजपूर येथील निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात अशोक पाटील व भुषण पाटील यांच्या माध्यमातुन व दिव्यांग संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य वाटप करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बंधुना सन्मान चिन्ह, शाल, पेन, वही, व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले त्यात वार्ता फाऊंडेशन फैजपूर संघाचे अध्यक्ष इदू पिंजारी
उपाध्यक्ष प्रा.उमाकांत पाटील सर वासुदेव सरोदे योगेश सोनवणे मयूर मेढे निलेश पाटील शाकीर मलिक राजेंद्र तायडे राजू तडवी सलीम पिंजारी समीर तडवी फारुख शेख शेखर पटेल
या पत्रकार बंधूना प्रांतधिकारी व तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना मार्गदर्शक राहुल कोल्हे व सुत्र संचालन दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष याेगेश उर्फ मुन्ना चौधरी यांनी केले. तर शेवटी उपस्थितांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष चेतन तळेले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सचिव विशाल दांडगे, चिराग पाटील, पराग वारके, सोनू कोळी,संगीता दांडगे, स्वाती कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
या विद्यार्थ्यांनी मिळवले बक्षीस.
फैजपूर येथील निवासी मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वात स्पर्धा घेण्यात आल्या. यात ५० मी धावणे या स्पर्धेत प्रथम गौरव थोरवे, द्वितीय गोपेश पाटील,स्पॉट जंप मध्ये प्रथम तुषार अभंग, द्वितीय साईराज राजपूत, तीनचाकी सायकल रेसिंग स्पर्धेत प्रथम शेख सोयब, द्वितीय नितीन महाजन, तृतीय विनोद बिऱ्हाडे यांना बक्षीस देण्यात आले. या दिव्यांगांना दिले साहित्य भेट या कार्यक्रमात दिव्यांग साहित्यात कुबड्या, व्हील चेअर, कृत्रीम हात, कृत्रीम पाय आणी प्रज्ञाचष्शु करीता काठी असे साहित्य विलास कोळी, ललित वाघूळदे, दिगंबर कोल्हे, रेखा कोळी, प्रमोद कोळी, बाळु चौधरी यांना भेट देण्यात आले. तसेच हस्त कलाकार मुन्ना चौधरी यांनी काचेच्या बॉटलमध्ये लाकडी बैलगाडी बनवली असून ती मान्यवरांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली.


No comments