३२ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंम्मेलनात श्री. भिमराज पावरा यांचे हिंदी अनुवादित साहित्य व काव्यसंग्रह प्रकाशित चोपडा प्रतिनिधी (संपादक...
३२ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंम्मेलनात श्री. भिमराज पावरा यांचे हिंदी अनुवादित साहित्य व काव्यसंग्रह प्रकाशित
चोपडा प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
दिनांक १३,१४,१५, जानेवारी २०२५ रोजी झालेल्या. आदिवासी एकता परिषद अंतर्गत " ३२ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंम्मेलनात पानखेडा ( पिंपळनेर) ता. साक्री जि धुळे ( महाराष्ट्र) येथे श्री. भिमराज पावरा यांचे स्वयंलिखित पहिले प्रकाशित झालेले सातपुड्यातील पावरा संस्कृतीवर आधारित मराठी साहित्य " आदिवासी पावरा संस्कृतीन जीवणो " हे हिंदी भाषेत अनुवाद केलेले साहित्य महासम्मेलनच्या मेळाव्यात आसाम राज्यातील आदिवासी संस्कृती पुजक श्रीमान डिपांकल खाजन्सी, मोरान कमिनीटीचे हाय प्रेसिडेंट व टिनूसुकिया खाजन्सी समाजसेविका यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यासोबतच आदिवासी संस्कृती दिनदर्शिकेचे संपादक श्री. संतोष पावरा, त्यासोबत कवी विठ्ठल भंडारी, प्रकाश पावरा, राहुल पावरा व इतर मान्यवर उपस्थित होते. पुस्तक भेट घेतांना डिपांकल खाजन्सी यांनी आदिवासी हिंदी साहित्य निर्माण केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या.
तसेच वोरसातोन गीदे ( पावसाळ्यातील काविता - वर्षा ॠतु की कविताएँ) भाषा पावरी, अनुवाद मराठी हिंदी ( अर्थसहित) हे दुसरे काव्यसंग्रह आदिवासी महासंमेलनाच्या मेळाव्यात अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटना, शिरपूर या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. दिनेश पावरा सर, डाॅ. हेमंत पावरा साहेब, मा. महेंद्र पावरा सर, मा. जितेंद्र भाऊसाहेब, मा. शिवराम पाडवी सर, मा. चंपालाल भाऊसाहेब, मा. भावसार भाऊसाहेब, मा. रोहिदास पावरा सर, यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तेव्हा प्रदेशाध्यक्ष दिनेश पावरा बोलत होते की, आदिवासी बोलीभाषेत साहित्य निर्माण करणे हे आपल्या समाजासाठी खूप गरज आहे. आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन करणे तसेच निसर्ग वाचला तरच आपण सुखरूप जगणार आहोत यासाठी आपण सर्वजण जल जंगल जमीन वाचवण्यासाठी कटीबद्ध आहोत असा मोलाचा संदेश दिला.


No comments