न्हावीच्या श्री गणेश सार्वजनिक वाचनालया तर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम सुरू इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) न्हावी ...
न्हावीच्या श्री गणेश सार्वजनिक वाचनालया तर्फे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम सुरू
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयातर्फे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत येथील जि प मराठी मुलींच्या शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील होते. तर व्यासपीठावर श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे सचिव युवराज तळेले, संचालक ललित कुमार फिरके व ग्रंथपाल ललित इंगळे उपस्थित होते. वाचन हे मूलभूत कौशल्य शालेय विद्यार्थ्यांनींमध्ये रुजवून काय वाचावे आणि वाचनाचा वेग कसा वाढवावा याबाबत सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित कुमार फिरके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय स्थानावरून चंद्रशेखर पाटील यांनी विद्यार्थिनींना दररोज वृत्तपत्र वाचन करणे गरजेचे आहे असे सांगून मोबाईल पाहण्यापेक्षा वृत्तपत्र सत्य माहिती वाचकांपर्यंत देत असून ती विश्वासार्ह असते. एवढे सांगून विद्यार्थ्यांना वृत्तपत्र व पुस्तके वाचन करून दाखविली व विद्यार्थ्यांनी कडून वाचन करून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिपिन कुमार वैद्य, राजश्री चौधरी,ग्रंथपाल ललित इंगळे यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव युवराज तळले यांनी केले.

No comments