adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे क्रीडांगणावर उपविभागीय कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी प्रांतअधिकारी यांना निवेदन

  फैजपूर येथे क्रीडांगणावर उपविभागीय कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी प्रांतअधिकारी यांना निवेदन क्रीडांगणावर उपविभागीय कार्...

 फैजपूर येथे क्रीडांगणावर उपविभागीय कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी

प्रांतअधिकारी यांना निवेदन

क्रीडांगणावर उपविभागीय कार्यालय बांधण्यात प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करताना नागरिक

इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

नगरपालिका संचलित मुन्सिपल हायस्कूलच्या मागील भागात असलेल्या लोकसेवक मधुकरराव चौधरी क्रीडांगणावर उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव रद्द करावा या मागणीचे निवेदन आज देण्यात आले प्रांताधिकारी उपविभाग फैजपूर व प्रभारी प्रशासक नगरपालिका फैजपूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले यात म्हटले आहे की नुकतेच येथून बदली होऊन गेलेल्या प्रभारी उपविभागीय अधिकारी श्रीमती देवयानी यादव मॅडम यांनी एक प्रस्ताव पारित केला होता की नगरपालिका संचलित मुन्सिपल हायस्कूलच्या मागील भागात असलेल्या लोकसेवा मधुकरराव चौधरी क्रीडांगणावर उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधण्यात यावा मात्र सध्या फैजपूर शहरांचा विस्तार खूप झपाट्याने वाढत आहे मुन्सिपल हायस्कूलच्या मागील भागात नगरपालिकेच्या वतीने विद्यार्थी व शहरातील युवकांना खेळण्यासाठी मैदान बांधून दिले या मैदानावर "प्लेग्राउंड" चे आरक्षण असून सुद्धा हा घाट घातला जात आहे या निवेदनात पुढे म्हटले आहे की फैजपूर शहराचा विस्तार पाहत तसेच किंवा यापेक्षा मोठे मैदानाची गरज या शहराला आहे पण असे न करता या उलट असलेल्या लोकसेवक मधुकरराव चौधरी क्रीडांगणावर उपविभागीय अधिकारी कार्यालय बांधण्यात येणार आहेत व खेळाडू युवकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे व आपण याकडे जातीने लक्ष द्यावे व हे प्रस्ताव रद्द करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे दरम्यान या मागणीवर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही समस्त शहरवासी यांच्या वतीने देण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष शेख कुरबान देवा चौधरी वसीम जनाब मुदस्सर  नजर कल्लू भाऊ मो.रियाज शेख मोहसीन जफर अली शेख जावेद आदी मान्यवर उपस्थित होते

No comments