चोपडा काँग्रेस तर्फे महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी साजरी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सका...
चोपडा काँग्रेस तर्फे महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी साजरी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस जनशिक्षण येथे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली,यावेळी भैय्यासाहेबांनी महात्मा गांधींचे विचार चळवळ व देशाप्रती योगदान याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे यांनी मनोगत व्यक्त केले,यावेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद,ग.स.चे माजी संचालक.रमेश एकनाथ शिंदे,मधुकर विठ्ठल पाटील,मोहन देवराम पाटील,छन्नु ताराचंद पाटील,अनिल युवराज पाटील, नरेंद्र पाटील,शांताराम लोहार,यशवंत खैरनार,रवींद्र श्री.प्रकाश आबा पाटील,योगेश पाटील,काशिनाथ व्यंकट पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments