adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलींनी सादर केलेल्या "जन्म बाईचा" कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध ....

  सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलींनी सादर केलेल्या "जन्म बाईचा" कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध .... मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायक...

 सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलींनी सादर केलेल्या "जन्म बाईचा" कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध ....


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

 जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम ने उपस्थित मान्यवर तथा पालकांची मने जिंकली.

जन्मबाई चा या इ.६ वीच्या मुलींनी सादर केलेल्या  कार्यक्रमाने प्रथम शिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मरण करून अभिवादन केले. संस्थेच्या चेअरमन कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय रोहिणी ताई खडसे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी श्री डीगंबर फेगडे तथा सर्व सन्माननीय संचालक यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्राचार्य श्री एन पी भोंबे यांनी प्रास्ताविकातून शाळेचा व संस्थेच्या प्रगतीचा लेखा जोखा मांडला.मुलांनी स्वहस्ताक्षरात तयार केलेल्या झेप या हस्त लिखिताचे प्रकाशन माननीय रोहिणी ताई खडसे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


सांस्कृतिक कार्यक्रम आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी विद्यालयातील माजी विद्यार्थी मुक्ताईनगर तालुक्यातील दुई येथील श्री डीगंबर फेगडे हल्ली वलसाड  गुजरात यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते इयत्ता १०/१२ वी मध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह व रोखबक्षिस देऊन कौतुक करण्यात आले.मुलांनी शिक्षणाची कास धरून व्यवसाय शिक्षणावर भरद्यावा,कुठलाही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो,तर व्यवसायाची सुरवात करणे गरजेचे असते फक्त चिकाटी आणि जिद्द ठेवावी.नोकरी च्या मागे नधावता नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करा,आपल्याला यश मिळते.माझी सुरुवात ही अशीच झाली आणि म्हणून मी आज गुजरात राज्यात चार कंपन्या चालवतोय.


असे आपल्या मनोगतातून त्यांनी मार्गदर्शन केले.संस्थेच्या चेअरमन कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय रोहिणी ताई खडसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुलांनी आपल्या शाळेतून बाहेर गेलेल्या उच्च पदस्थ व्यक्तींचे अनुकरण करून वाटचाल करावी.पारितोषिक किंवा बक्षीस ही आपल्याला प्रेरणा देतात.आपणही असे यश संपादन करून मोठे होण्याचा प्रयत्न करावा.आपल्या पालकांचे व शाळेचे नावलौकिक करावे असे मत मांडले.बक्षीस वितरण समारंभ संपल्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून  जन्म बाईचा ,रिमिक्स साँग,मंगळगौरी,व्यसनमुक्ती नाटिका, शिवतांडव,वासुदेव आला,भारत मातेचा जोगवा.....या सारख्या अनेक कार्यक्रमांनी पालकांची आणि उपस्थितांची मने जिंकली.प्रसंगी उपाध्यक्ष श्री नारायण दादा चौधरी,संचालक श्री आर पी बऱ्हाटे, श्री महेशभाऊ   पाटील,श्री रमेशभाऊ खाचने,श्री मारोतीभाऊ बढे सर्व संचालक मंडळ वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक, सां.मंडळाचे अध्यक्ष एस आर ठाकुर,उपाध्यक्ष बी एम कोल्हे,सचिव ए एम खडसे ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनी उपस्थित होते.सूत्र संचालन सौ. आर व्ही महाजन यांनी केले.पाहुण्यांचा परिचय आर वाय सोनवणे यांनी करून दिला.बक्षीस वाचन ए के भगत व एल व्ही पाटील यांनी केले.तर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष एस आर ठाकुर यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचा उद्देश सांगितला आणि प्रमुख पाहुणे ,सर्व मान्यवर तथा पालकांचे आभार मानले.शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला.

No comments