ट्रकच्या धडकेत वरपित्याचा मृत्यू वाघोदा वडगांव दरम्यान सुकी नदी पुलाजवळील घटना मुलाच्या लग्नाच्या हळदीच्या एका दिवसा आधीच वर पित्याचे अप...
ट्रकच्या धडकेत वरपित्याचा मृत्यू वाघोदा वडगांव दरम्यान सुकी नदी पुलाजवळील घटना
मुलाच्या लग्नाच्या हळदीच्या एका दिवसा आधीच वर पित्याचे अपघातात मृत्यू
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 
काल्पनिक फाईल चित्र
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वडगावपुढे सुकी नदीजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन दिवसांवर लग्न असलेल्या नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू झाला. शेख हाजीक शेख सादीक (वय ५२) असे मृताचे नाव आहे. रावेरकडून भरधाव येणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच १८ बीजी ९४२१) ने वाघोदाकडून येणारी दुचाकी (क्रमांक एमएच १९ डिई ७२१०) ला जोरदार धडक दिली. मोठा वाघोदा येथील रहिवासी शेख हाजीक शेख साजिद हे विवरा येथे दुचाकीवरून लग्नाच्या कामानिमित्त जात असतांना हा अपघात झाला.व या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने मोठा वाघोदा गावात शोककळा पसरली मयतावर शोकाकुल वातावरणात मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले
No comments