adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

११२ कॉलच्या मदतीने अल्पवयीन मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

  ११२ कॉलच्या मदतीने अल्पवयीन मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन अहील्यानगर (दि.२१ प्रतिनिधी):- (संपादक-:- हेमकांत गायकवाड) वांबोरी घाटात रात्रीच्य...

 ११२ कॉलच्या मदतीने अल्पवयीन मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन


अहील्यानगर (दि.२१ प्रतिनिधी):-

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

वांबोरी घाटात रात्रीच्या वेळी बिथरलेल्या अवस्थेतील  घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलींना ११२ कॉलच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ  कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.ही घटना दि.१९ जानेवारी २०२५ रोजी घडली.याबाबत सविस्तर माहिती अशीकी,वांबोरी घाटामध्ये दोन अल्पवयीन मुली वय अंदाजे १३ व १४ वर्षे या वांबोरी घाटातून पायी बिथरलेल्या मनस्थितीत घाट उतरत असताना दिसल्याने वांबोरी येथील श्री.बाबासाहेब भिटे  यांनी सदर मुलींकडे चौकशी करून एवढं सायंकाळी त्या घाटात का बरं चालल्या आहे अशी विचारणा केली असता त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील एका आश्रम शाळेतून आलेलो आहे असे सांगून उडवा उडवीची उत्तरे दिली . परंतु श्री भिटे यांनी संध्याकाळची वेळ झालेली असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर मुलींची आस्थेने चौकशी करून त्यांच्या बाबतीत राहुरी पोलीस स्टेशनला ११२ नंबर वर कॉल करून तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना फोनवर संपर्क साधून माहिती दिली व त्यांना स्वतःच्या घरी घेवुन जावुन त्यांना  त्यांची पत्नी सौ.मंदा बाबासाहेब भिटे यांनी त्या मुलींना जेवण दिले . त्याच वेळी मुलीं बाबत माहिती मिळाल्याने  राहुरी पोलीस स्टेशन कडील पोलीस हवालदार वाल्मीक पारधी यांनी समक्ष जाऊन सदर मुलींची खात्री करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनातील नैराश्य व भीती काढून अधिक माहिती घेतली.व त्या पिपळगांव माळवी ता.नगर जि. अहिल्यानगर यागावातून निघून आलेले आहेत असे सांगितले.त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन ने एमआयडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. माणिक चौधरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नातेवाईकांना बोलावून सदर मुलींना आई व वडिलांच्या ताब्यात दिले. 

सदर मुलींच्या बाबतीत श्री.बाबासाहेब भिटे व  सौ.मंदा बाबासाहेब भिटे  यांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे ११२ प्रणाली वर तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना संपर्क साधल्याने त्यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानले.

No comments