लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळातर्फे शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कु. सोनल खर्चेचा सत्कार अमोल बावस्कार बुलढाणा ...
लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळातर्फे शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कु. सोनल खर्चेचा सत्कार
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धा २० ते २५ डिसेंबर २०२४ पर्यंत देवास (मध्यप्रदेश) येथे पार पडल्या. या स्पर्धेत नूतन विद्यालय , मलकापूरची खेळाडू कु. सोनल गणेश खर्चे हीचा १७ वर्षे वयोगटातील स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने नेत्रदीपक कामगिरी करून छत्तीसगढ संघाचा पराभव करून सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या या यशात कु. सोनल खर्चेची कामगिरी सुद्धा उल्लेखनीय ठरली. त्यानिमित्त लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळ, मलकापूर तर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव डॉ. अरविंदजी कोलते होते. तसेच प्रमुख उपस्थिती मंडळाचे संचालक श्री सुधीरभाऊ पाचपांडे श्री. अनिलभाऊ इंगळे, श्री. देवेंद्र पाटील, प्रख्यात स्त्री रोग तज्ञ सौ. स्नेहाताई कोलते मॅडम, प्राचार्य श्री. ए. डी. बोरले क्रीडा शिक्षक दिनेश राठोड, रामा भारंबे, गणेश खर्चे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची होती.
या प्रसंगी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रश्नमंजुषा , समयस्फुर्त भाषण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु. पुर्वा श्याम चोपडे हीचा डॉ. अरविंद कोलते यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. एस. सपकाळ तर आभारप्रदर्शन सचिन पाटील यांनी केले.

No comments