adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस आय लव यू नगर भागात भिंगार कॅम्प पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस आय लव यू नगर भागात भिंगार कॅम्प पोलिसांनी ठोकल्या बेड्या अहिल्यानगर (दि.१८ प्रतिनिधी):- (संपादक-:- हेमकांत ...

 खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस आय लव यू नगर भागात भिंगार कॅम्प पोलिसांनी ठोकल्या बेड्या


अहिल्यानगर (दि.१८ प्रतिनिधी):-

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीस पकडण्यात भिंगार कॅम्प  पोलीसांना यश आले आहे.दि.१० जानेवारी रोजी घटनेतील फिर्यादी अक्षय संजय हंपे व त्याचा मित्र करण पाटील असे दोघेजण नगर पाथर्डी रोडवरील फिटनेस जीम येथुन व्यायाम करुन ईलेक्ट्रीक मोपेडवर बसुन विजयलाईन चौका जवळ एस.के.चाय क्लब समोर समोरुन घरी जात असताना यातील आरोपी शुभम उर्फ गुव्या संतोष शिंदे सैनिक नगर भिंगार,करण उर्फ प्रथमेश रामदास भिंगारदिवे रा.भिंगार, रुपेश भारत शिंदे रा.सैनिकनगर,प्रशांत उर्फ सोन्या सुनिल भिंगारदिवे रा. सावतानगर पंपींग स्टेशन,अक्षय उर्फ डॉन आण्णासाहेब जावळे रा.द्वारकाधीश कॉलनी,ओंकार उर्फ भैया काळू चांदणे रा. द्वाराकाधीश कॉलनी, भिंगार,विशाल उर्फ बजरंग भिम ससाणे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, भिंगार, प्रताप सुनिल मिंगारदिवे रा.भिंगार यांनी संगणमत करुन गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीची मोपेड गाडी अडवुन त्यास गाडीवरुन खाली ओढून तु आमच्याकड़े रागाने पाहुन आम्हाला खुन्नस का देतो असे म्हणुन फिर्यादीस लाथाबुक्क्याने लोखंडी रॉड,लाकडी दांडके व दगडाने मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व फिर्यादीचे गळ्यातील चैन बळजबरीने हिसकावुन घेऊन निघुन गेले.या बाबत कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं-26/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,119, 18(1),1182), 126(2),115(2), 189(2),190, 1912), 1913) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्हद्यातील आरोपी हे आय लव यु नगर भागातील एल.आंय.सी. ऑफिसच्या बाजूला चहाचे टपरीवर येणार असल्याची गोपणीय माहिती सहा.पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला एक पथक तयार करुन पथकातील अंमलदार यांना नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा लावला असता थोड़या वेळातच वरिल गुन्ह्यातील आरोपी तेथे आले.त्यांना पोलीस' आल्याची चाहुल लागताच ते पळून जाण्याचे तयारीत असताना त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफिने ताब्यात घेतले.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अहिल्यानगर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, सफौ.बाबासाहेब अकोलकर,सफौ. रेवननाथ दहीफळे, पोहेकॉ.दिपक शिंदे,रवि टकले,पोकॉ.समीर शेख, महादेव पवार,प्रमोद लहारे यांनी केली आहे.

No comments