adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगावात कोळी जमातीच्या सामूहिक विवाह संस्थेची कार्यकारिणी गठित.. ( ५१ जोडप्यांचा मोफत विवाह संकल्प; १० जोडप्यांची झाली नोंदणी )

  जळगावात कोळी जमातीच्या सामूहिक विवाह संस्थेची कार्यकारिणी गठित.. ( ५१ जोडप्यांचा मोफत विवाह संकल्प; १० जोडप्यांची झाली नोंदणी ) मच्छिंद्र ...

 जळगावात कोळी जमातीच्या सामूहिक विवाह संस्थेची कार्यकारिणी गठित..

( ५१ जोडप्यांचा मोफत विवाह संकल्प; १० जोडप्यांची झाली नोंदणी )


मच्छिंद्र कोळी गलंगी तालुका (प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी जमाती मधील गरीब गरजू लोकांच्या विवाहेच्छुंक मुला-मुलींसाठी संपूर्ण मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि. ४ मे २०२५ रविवारी रोजी करण्यात येत असून त्याबाबतची नियोजन बैठक जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे (उर्फ चत्तुआबा) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. प्रास्ताविक कोळी जमातीचे आंदोलन-उपोषणकर्ते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी केले. तसेच माजी पोलीस अधिकारी छगनराव देवराज, समाजसेवक पंडितराव जोहरे, महेंद्रकुमार मोंढाळे, गुलाबराव सोनवणे, मच्छिंद्र कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. ह्यावर्षी ५१ जोडप्यांचा सामुहिक विवाह करायचा संकल्प संस्थेने केला आहे. पहिल्याच बैठकीत १० जोडप्यांची नोंदणी झाली आहे. याप्रसंगी नियोजित कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे गठित करण्यात आली. 

        त्यात अध्यक्ष गोकुळ सूर्यवंशी, उपाध्यक्ष विशाल सपकाळे, सचिव अनिल कोळी, सदस्य भिकनराव नन्नवरे, रामचंद्र तायडे, अक्षय सोनवणे, रवींद्र कोळी, सागर सोनवणे, दिपक टेलर, संजय बाविस्कर, शिवाजी सूर्यवंशी, शैलेंद्र सपकाळे, आनंद सपकाळे, गणेश बाविस्कर, मनोज सपकाळे, सतीश कोळी, लक्ष्मण कोळी, आकाश सपकाळे यांचेसह प्रचार व प्रसिद्धी प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, प्रेस फोटोग्राफर पांडुरंग कोळी यांचीही सुयोग्य निवड करण्यात आली. तसेच तालुका प्रतिनिधी म्हणून महेंद्र सपकाळे (जळगाव), छगनराव देवराज (चोपडा), मधुकरगुरु सोनवणे (अमळनेर), भाईदास कोळी (पारोळा), सुनील मोरे (भडगाव), मच्छिंद्र कोळी (चाळीसगाव), दशरथ जाधव (पाचोरा), गुलाबराव सोनवणे (धरणगाव), पंडितराव जोहरे (जामनेर), शांताराम कोळी (बोदवड), महेंद्रकुमार मोंढाळे (मुक्ताईनगर), गंभीरराव उन्हाळे (रावेर), दिलीप कोळी (यावल), अनिल तायडे (भुसावल), भिका कोळी (एरंडोल) यांचीही नियुक्ती करण्यात आली. यावेळी कोळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नवनियुक्त जिल्हा व तालुका प्रतिनिधी यांचा अध्यक्षांच्या हस्ते  यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन प्रा.भाऊसाहेब सोनवणे तर आभारप्रदर्शन अनिल कोळी यांनी केले.

No comments