adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वा.सै.श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन

 स्वा.सै.श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायक...

 स्वा.सै.श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी विद्यालयात संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण व विद्यालयाच्या माजी संचालिका सौ भारती चव्हाण यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र आदरांजली अर्पण केली. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. 

गाडगे महाराजांनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व तसेच संत गाडगे महाराज यांच्या कीर्तनातील उदाहरणे देऊन महाराजांच्या समाज प्रबोधनाच्या कार्याविषयी माहिती दिली. या सोबतच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व विशद करत वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, शालेय स्वच्छता, ग्रामस्वच्छता राखण्यासाठी प्रवृत्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्री आर बी साळुंखे व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments