प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये 89 वी त्रिमूर्ती शिवजयंती साजरी भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) प्रजापिता ...
प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये 89 वी त्रिमूर्ती शिवजयंती साजरी
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यावल च्या वतीने शहरात सेवाकेंद्र प्रभारी ब्रह्माकुमारी राजश्री दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्त्र ज्योतिर्लिंग झाकी चे भव्य आयोजन करण्यात आले.
परमपिता परमात्मा शिव यांची 89 वी जयंती च्या निमित्ताने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तीन दिवसीय 25 ,26 ,27 फेब्रुवारी 2025 रोजी ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने दयालक्ष्मी नगर येथील ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या स्थानिक शाखेमध्ये सहस्त्र ज्योतिर्लिंग झाकीचे भव्य आयोजन करण्यात आले सोबतच आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी रुद्र गीता ज्ञानयज्ञ ,सेल्फी पॉईंट हे प्रमुख आकर्षण ठरले. ब्रह्मकुमारी राजश्री दीदी या यावल येथील तहसीलदार सोमोहनमाला नाझीरकर यांना माहिती देतांना
या कार्यक्रमाचा शुभारंभ 25 फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता करण्यात आला या कार्यक्रमाप्रमुख पाहुणे म्हणून, आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल पटेल, डॉ मनोज वारके तसेच वढोदा गावचे सरपंच, संदीप सोनवणे यांची हजेरी होती
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संध्याकाळी ६.३० वाजता परमात्मा शिव यांची महाआरती करण्यात आली. आलेल्या पाहुण्यांनी सहस्त्रलिंग दर्शन झाकीचे अवलोकन केले त्यानंतर चिनावल येथून आलेल्या चिनावल सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी हिरादीदी यांनी आलेल्या पाहुण्यांना शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य सांगितले तसेच ब्रह्माकुमारी श्रद्धा दीदी यांनी ब्रह्माकुमारी विद्यालयाचा संक्षिप्त परिचय दिला तसेच विद्यालया च्या विंग्स मार्फत कशाप्रकारे सेवा होते याची पाहुण्यांना माहिती दिली
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारीख महाशिवरात्रीला सकाळी
परमपिता परमात्मा शिव यांच्या झेंड्याचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले तसेच केक कटिंग करून परमात्मा शिव यांचा अवतरण दिवस साजरा करण्यात आला
त्यानंतर सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी राजश्री दीदी यांनी शिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य स्पष्ट केले तसेच परमात्मा शिव यांना धोत्र्याचे फुल, बेलाचे पान का वाहतात याचे महत्त्व सांगितले
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांना ईश्वरीय भेटवस्तू व प्रसाद देण्यात आला
अशा प्रकारे तिघही दिवस मान्यवरांच्या हातून महाआरती करण्यात येत होती त्यामध्ये तहसीलदार मोहन माला नाझीरकर, डॉक्टर धीरज चौधरी, नायब तहसीलदार ,किनगावच्या सरपंच ताई भारती पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे जिल्हा परिषद सदस्य, वन अधिकारी भरत तायडे, कृषी सहाय्यक अधिकारी मनीषा तायडे, राजेश गडे वकील, यावल चे प्रसिद्ध व्यापारी तुषार जंगले, बाल संस्कार विद्यामंदिर चे शिक्षक सुनील सावगी यांची प्रमुख उपस्थिती लाभलीव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे किनगावच्या छायाताई बियाणी यांनी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत नृत्य कुमारी श्रुती व कुमारी देवयानी यांनी केले आणि आलेल्या पाहुण्यांचे आभार प्रदर्शन संदीप सोनवणे यांनी केले त्यांना माउंट आबू येथे येण्याचे निमंत्रण देखील ब्रह्माकुमारी राजश्री दीदी यांनी दिले. तसेच शिवभक्तांच्या आग्रहावरून एक दिवस कार्यक्रम परत वाढवण्यात आलेला आहे..
हा कार्यक्रम पूर्णपणे सफल होण्यासाठी संदीप यादव, चेतन बारी, संजू जोगी, सागर यादव ,संजू यादव, रागिनी चोपडे, शारदा इंगळे सुनंदा सूर्यवंशी भावना बारी लता सोनार देवेंद्र करांडे निखिल फेगडे राकेश नेमाडे लता पवार सुनंदा धनगर सिंधू धनगर शोभा धनगर प्रतिभा शिवसागर मीराबाई पाटील सुमन पाटील मालती पाटील प्रमिला पाटील शोभा पाटील छाया पाटील आशा बोरसे दिलीप येवले, प्रमिला यादव कीर्ती यादव रीना यादव संकेत त्रिभुवन सौरभ यादव भूषण तायडे या सर्वांचे उत्तम सहकार्य लाभले
No comments