adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर शहरातील बंद सी सी टी वी कॅमेरे त्वरित सुरू करावे

  फैजपूर शहरातील बंद सी सी टी वी कॅमेरे त्वरित सुरू करावे नायब तहसीलदार यांना निवेदन सादर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फै...

 फैजपूर शहरातील बंद सी सी टी वी कॅमेरे त्वरित सुरू करावे

नायब तहसीलदार यांना निवेदन सादर


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरात सी सी टी वी कॅमेरा किमान दोन वर्षांपूर्वी पासून बंद पडलेले आहेत फैजपूर शहरात मुख्य ठिकाणी नगर पालिकेकडून सी सी टी वी कॅमेरा लावण्यात आले होते पण सध्या ते बंद अवस्थेत आहे शहरात सी सी टी वी कॅमेरा सुरु असे पर्यंत पोलीसांची नजर सर्व शहरावर होती गुन्हेगारीवर वचक होता 

येत्या मार्च महिन्यात आता शहरात प्रतिष्ठित खंडोबा यात्रेची सुरुवात होणार आहे तसेच रमजान महिन्यांची देखील सुरुवात होत आहे अशा सणा सुद्धीच्या महिन्यात समाज कंटक कींवा उपद्रवी प्रवृत्ती कडुन काही झाल्यास शहरातील जातिय सलोख्यास धक्का पोहोचू शकतो अशा स्थितीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगर पालिकेने त्वरित दखल घेऊन सी सी टी वी कॅमेरा सुरू करावे अशी विनंती प्रांताधिकारी तथा प्रशासक नगरपालिका फैजपूर बबनराव काकडे साहेब यांच्या कडे लिमरा फाउंडेशनचे अध्यक्ष वसीम जनाब व न्यु खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नज़र यांच्या कडून करण्यात आली  नायब तहसीलदार जगदीश गुरव यांनी निवेदन स्वीकारले

No comments