चोपडा येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद तालुकास्तरीय नियोजन सभा संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथे संवि...
चोपडा येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद तालुकास्तरीय नियोजन सभा संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे संविधान सन्मान परिषदेचे नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन अशोक बाविस्कर माजी नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखली करण्यात आले होते.खानदेशातील पहिलीच राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद 16 मार्च 2025 रोजी एरंडोल जि.जळगाव या ठिकाणी होणार आहे.राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थिती देणार आहेत रिपब्लिकन सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटन करणार असून संविधान तज्ञ डॉक्टर अनंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होणार आहे,तसेस महाराष्ट्रातील विद्वान संविधान अभ्यासकांच्या माध्यमातून परिषदेमध्ये प्रबोधन होणार...संविधान जागरण तथा प्रचार व प्रसार आणि संविधानाचा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा, यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असे मुख्य संयोजक प्रा.भरत शिरसाठ यांनी आपल्या मनोगतात सागितले. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक जयसिंग वाघ,धनराज मोतिराय यांनी संविधान सन्मान परिषदेचे आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली सदर बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भरत भिमराव शिरसाठ यांनी केले.यावेळी प्रा.नरेंद्र गायकवाड व समाज बांधव उपस्थित होते.
No comments