वरखेडी वि.का.सो चेअरमन पदी वाल्मीक पाटील यांची निवड जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वरखेडी (ता. एरंडोल...
वरखेडी वि.का.सो चेअरमन पदी वाल्मीक पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वरखेडी (ता. एरंडोल):- येथे नुकतीच विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. त्यात सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी वाल्मीक पाटील यांची चेअरमन पदी बिनिरोध निवड करण्यात आली.
यावेळी विकास कार्यकारी सोसयटी चे सचिव संजय पाटील व सर्व सदस्य प्रकाश पाटील, सिताराम पाटील,भावलाल पाटील, विठ्ठल मराठे, समाधान मराठे, अनिल पाटील, भैया मराठे, धनराज पाटील, रावन पाटील , शितल पाटील ,विजूबाईपाटील,भीमराव मराठे,रामचंद्र मराठे,आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून विजय देशमुख यांनी काम पाहिले. सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी वाल्मीक पाटील यांना निवडीबद्दल सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments