वॉचमनला डॉक्टर कडून जीवे ठार मारण्याची धमकी सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२८):- फॅन्टसी टॉवर येथे वॉच...
वॉचमनला डॉक्टर कडून जीवे ठार मारण्याची धमकी
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२८):- फॅन्टसी टॉवर येथे वॉचमन म्हणजे काम करणारे शंकर भालेश्याम कोडम यांना सुरभी हॉस्पिटलचे डायरेक्टर अमित भराडिया (रा.फॅन्टसी टॉवर फ्लॅट पारिजात चौक गुलमोहर रोड) यांनी बेदम मारहाण केली.सोसायटीच्या नियमानुसार वॉचमन कोडम यांनी डॉ.अमित भराडीया यांना त्यांची गाडी या ठिकाणी लावू नका असे म्हटल्याने त्याचा राग येऊन भराडीया यांनी कोडम यांना बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.तसेच सिक्युरिटी एजन्सी चे मालक मनसुख वाबळे हे आरोपी भराडीया यांना विचारावयास गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली.शंकर भालेश्याम कोडम यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोहेकॉ/दत्तात्रय शिरसाट करीत आहेत.
No comments