adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्टेट बँक ऑफ इंडिया यावल शाखेची तत्परता ग्राहकाला मिळाला चाळीस लाखाचा अपघात विमा

  स्टेट बँक ऑफ इंडिया यावल शाखेची तत्परता ग्राहकाला मिळाला चाळीस लाखाचा अपघात विमा शब्बीर खान यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   ...

 स्टेट बँक ऑफ इंडिया यावल शाखेची तत्परता ग्राहकाला मिळाला चाळीस लाखाचा अपघात विमा


शब्बीर खान यावल प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

                यावल तहसील कार्यालयातील शिपाई कै. बाळू पाटील यांचे २० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक टपाल देऊन घरी परतत असताना, दुर्दैवी अपघाती निधन झाले होते. भारतीय स्टेट बँक यावल शाखेतील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून जलदगतीने प्रकरण निकाली काढले.व मयत परिवारातील कुटुंबाला ४० लाखाचा विम्याची  रक्कम तत्काळ मिळवून दिली.  कै.बाळू पाटील यावल तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते व त्यांचे पगाराचे खाते राज्य  सॅलरी पॅकेज अंतर्गत भारतीय स्टेट बँक यावलयेथे होते, सोबत त्यांच्या पत्नीचे हि खाते स्टेट बँकेत होते. कै.बाळू पाटील यांचे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे पगार खात्याला ४० लाखाचा अपघात विमा रक्कम मंजूर करण्यात आली.   

श्री धर्मेंद्र सिंग  रिजनल मॅनेजर भारतीय स्टेट बँक जळगाव,फैजपूर प्रांत अधिकारी श्री बबन काकडे सर, श्रीमती मोहनमाला नाझीरकर तहसीलदार यावल, श्री. राधेश्याम मुंगमोडे भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक यावल, श्री सागर खेडेकर मुख्य प्रबंधक भारतीय स्टेट बँक जळगाव यांच्या उपस्थिती विमाची रक्कम त्यांच्या कुटुंबाला देण्यात आली. कै. बाळू पाटील यांच्या कुटुंबाने भारतीय स्टेट बँकेचे आभार मानले.

सर्व नोकरदार वर्गाने भारतीय स्टेट बँकेत आपले पगार खाते ठेवून राज्य  सॅलरी पॅकेज अंतर्गत असलेले विविध लाभ घ्यावे असे आवाहन श्री. धर्मेंद्र कुमार सिंग यांनी केले आहे.

No comments