मनवेल आश्रमशाळेत मराठी गौरव दिन साजरा यावल : मनवेल येथील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत मराठी भाषा गौरव दिन उत...
मनवेल आश्रमशाळेत मराठी गौरव दिन साजरा
यावल : मनवेल येथील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सेवानिवृत्त अधीक्षक वसंतराव पाटील होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो ते थोर साहित्यिक , कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
शिक्षक राकेश महाजन यांनी कवी कुसुमाग्रज यांचा परिचय करून देऊन मराठी भाषेचे महत्त्व विशद केले . यावेळी कवी कुसुमाग्रजांची कणा कविता विद्यार्थ्यांना स्पीकरवर ऐकविण्यात आली . शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे वाचन केले . मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाला माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील , अधिक्षिका सरिता तडवी , शिक्षक सुभाष पाटील , नितीन चौधरी , कैलास बेलदार , विजय चव्हाण , इंद्रजित पाटील , राजेश भारूळे , राजू पावरा , मोहीत अत्तरदे , दिपक ढाके , सचिन विलास पाटील , चेतन चौधरी उपस्थित होते .
No comments