adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय व प्रेरक - रोटरी प्रांतपाल राजिंदर खुराणा

  चोपडा रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय व प्रेरक - रोटरी प्रांतपाल राजिंदर  खुराणा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा - मैत्री...

 चोपडा रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय व प्रेरक - रोटरी प्रांतपाल राजिंदर  खुराणा


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा - मैत्री आणि सेवेचा विचार कृतीतून रुजविणारी चळवळ म्हणून रोटरी आज जगाला परिचित आहे. गरजांवर आधारित प्रकल्प हाती घेऊन त्यानुसार कार्य करणाऱ्या चोपडा रोटरी क्लबने गेल्या ५४ वर्षात उल्लेखनीय व  प्रशंसनीय कार्य केले असून ते इतर क्लबसाठी प्रेरक आहे, असे गौरवोद्गार काढत रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल राजिंदर खुराणा यांनी चोपडा क्लबचे अभिनंदन करुन क्लबच्या ५४ व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.


        येथील धरणगाव रोडवरील हॉटेल निलांजन येथे ते रोटरी सदस्यांशी संवाद साधतांना बोलत होते. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करुन पूजन केले.

           प्रांतपाल भेटीदरम्यान क्लब असेंबलीमध्ये सर्व बी ओ डी मेंबर्स व डिस्ट्रिक्ट ऑफिसर व सदस्यांच्या बैठकीत प्रांतपाल रोटे. राजिंदर खुराणा यांनी रोटरी क्लब चोपडा तर्फे राबविण्यात आलेल्या प्रकल्पांबद्दलची माहिती जाणून घेत मार्गदर्शन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


@सेवा प्रकल्पांना भेट व उद्घाटन@

प्रांतपाल रोटे. राजींदर खुराणा यांनी चोपडा रोटरी क्लबच्या विविध सेवा प्रकल्पांना भेट देत माहिती घेतली तर शहरात काही प्रकल्पांचे उद्घाटन केले. यात

कमलाबाई नेहरू मुलींचे आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थिनींच्या मनोरंजनासाठी व अध्ययनासाठी एक टीव्ही संच भेट देण्यात आला. तसेच विविध सार्वजनिक उत्सवांच्या वेळी तत्परतेने सेवा देणाऱ्या होमगार्ड बंधू व भगिनी यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी सिमेंटचे दोन बाक भेट दिले. तर विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून मेघुराया चौकात रोटरी क्लब चोपडा प्रायोजित संत रोहिदास महाराज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. हरताळकर हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या डायलिसिस सेंटरला तसेच यमुनाई फिजिओथेरपी हॉस्पिटलला सुरु असणाऱ्या रोटरी ऑर्थोपेडीक लायब्ररीला भेट देऊन तेथील सुविधांची प्रशंसा केली.

          चोपडा रोटरी क्लब तर्फे तालुक्यातील वडती येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाला वॉटर कुलर प्रांतपाल रोटे. राजिंदर खुराणा व सौ. गिनी खुराणा यांच्या हस्ते भेट देण्यात आला. तसेच बचत गटात काम करणाऱ्या स्त्रियांना महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत संगिता बाविस्कर, रिटा सपकाळे, निर्मला महाजन, शीतल पाटील यांना  शिलाई मशीन वितरित करण्यात आले.

       विविध सेवा क्षेत्रात निस्वार्थपणे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 'रोटरी व्होकेशनल अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :

सुनील वेडू पाटील (सफाईगार), 

प्रवीण नामदेव चौधरी (एसटी वाहक), 

विजय शिरसाट (वनरक्षक), भैय्या प्रल्हाद बाविस्कर (पाणीपुरवठा मजूर), रवींद्र धर्मराज पाटील (पोस्टमन), विजय मधुकर बच्छाव (पोलीस अमलदार), मनोज श्रावण पारधी (वाचमन अमरधाम) व सम्राट वाडे (व्यवस्थापक पाणीपुरवठा विभाग)

         कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष रोटे डॉ. ईश्वर सौदाणकर, मानद सचिव भालचंद्र शिवाजी पवार, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील (बा) व सर्व रोटरी सदस्य बंधू व भगिनी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा, सचिव व सदस्या उपस्थित होत्या. प्रस्तावना रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. संजय बारी, विलास पी. पाटील व लीना पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले.

No comments