adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर येथे शिवजयंती जल्लोषात साजरी

  मलकापूर येथे शिवजयंती जल्लोषात साजरी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मलकापूर :- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रौढ प...

 मलकापूर येथे शिवजयंती जल्लोषात साजरी


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मलकापूर :- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रौढ प्रताप पुरंदर, अठरा पगड जाती- धर्मातील असंख्य मावळ्यांना एकत्र आणणारे, पराक्रम व परिश्रमातून उज्वल इतिहास घडविणारे, जाणते राजे  छत्रपती  श्री शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.


सर्वप्रथम सकाळी छत्रपती शिवाजी नगर येथील आई तुळजाभवानी मातेचे विधीवत पुजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्यासमोर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येऊन मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला. तर आई तुळजाभवानी मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी माल्यार्पण करून जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत जाणता राजाला अभिवादन केले.


त्यानंतर सकाळी १० वाजता तरूणांची मोटार सायकल रॅली तर ११ वाजता जिजाऊ-सावित्रीच्या लेकींनी उत्स्फूर्तपणे मोटार सायकल रॅली काढली. तर दुपारी आई तुळजाभवानी फाऊंडेशनच्या आयोजनात शहरातील विविध भागातील मंडळांनी शिवजयंती उत्सवानिमित्त वेगवेगळ्या देखाव्यांचे सादरीकरण करीत निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला. सदर निघालेली मिरवणूक बुलढाणा रोड, तहसीलचौक, मुक्ताईनगर रोड मार्गे छत्रपती शिवाजी नगर येथील आई तुळजाभवानी व शिवपुतळ्याला मानवंदना देऊन पुढे चारखंबा चौक, निमवाडी चौक, सिनेमारोड मार्गे पुन्हा हनुमान चौक येथे आयोजित मुख्य कार्यक्रमस्थळी या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. 


यावेळी हनुमान चौक येथे सायंकाळी आयोजित कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत पोवाडे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची महती विषद करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या मंडळांचा व आदींचा पारितोषीक देऊन सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

No comments