adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तहसीलदार भुसावळ यांचा शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले वाटपाचा उपक्रम

  तहसीलदार भुसावळ यांचा शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले वाटपाचा उपक्रम भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराजस्व अभियानांतर...

 तहसीलदार भुसावळ यांचा शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले वाटपाचा उपक्रम


भुसावळ प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराजस्व अभियानांतर्गत शिक्षण अधिकारी व शाळेतील सर्व मुख्याध्यापक तालुक्यातील सर्व सेतू चालक  यांची संयुक्तिक बैठक आयोजित करून  विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशास लागणारे आवश्यक व महसूल विभागाकडून वाटप होणारे जातीचे दाखले वय अधिवास, राष्ट्रीयत्व, आर्थिक दुर्बल घटक, नॉन क्रिमीलेअर उत्पन्न दाखले विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशापूर्वीच शाळेतच उपलब्ध व्हावे नियोजन केले होते 


त्याअनुषंगाने दिनांक 19  फेब्रुवारी 2025 रोजी वराडसीम येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयात 5 वी ते 10 वी चे एकूण जातींचे 49 दाखले 84 इतर दाखले असे एकूण 143 दाखले वितरण तहसीलदार भुसावळ यांचे हस्ते वाटप करणेत आले. विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटचाली करता मार्गदर्शन केले

सदरचा कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामपंचायत वराडसीम येथे ग्रामपंचायत दक्षता समितीची बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला नागरिकांच्या तहसील कार्यालयाच्या संबंधित काही अडचणी समस्या ऐकून घेतल्या  काही आदिवासी जमातीचे  योजनेचा लाभ मिळत नसला तसेच जातीचे दाखले मिळत नसल्याबाबत यावरून तहसीलदार मॅडम यांनी  मंडळ अधिकारी यांना स्थानिक चौकशी करून प्रस्ताव  सादर करणेबाबत सूचना दिल्या आश्वासित केले आदिवासी महिलांना याबाबत आनंद व्यक्त केला असेच उपक्रम यापुढे प्रत्येक गावात घेतला जाईल असे तहसीलदार मॅडम यांनी सांगितले

No comments