वैष्णवी रत्नपारखी हिची विद्यापीठ संघात निवड मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड संपादक हेमकांत गायकवाड मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर तालुका एज...
वैष्णवी रत्नपारखी हिची विद्यापीठ संघात निवड
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
संपादक हेमकांत गायकवाड
मुक्ताईनगर :-मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयाची खेळाडू वैष्णवी श्रीकृष्ण रत्नपारखी हिची क्रीडा महोत्सव २०२४/२५ करिता विद्यापीठ संघात निवड झाली. २६ व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव २०२४/२५ चे आयोजन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ,चंद्रपूर येथे दिनांक १७ ते २२ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान केलेले आहे .यात क.ब. चौ .उ.म.विद्यापीठ जळगाव महिला कबड्डी संघात वैष्णवी श्रीकृष्ण रत्नपारखी हिची निवड झाली .
यापूर्वी एकत्रित सराव शिबिराचे आयोजन विद्यापीठ क्रीडा संकुलात दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित केलेले होते.
वैष्णवी हिला प्रा.डॉ प्रतिभा ढाके ,क्रीडासंचालक यांचे मार्गदर्शन मिळाले.
तिच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष मा.एडवोकेट सौ .रोहिणी ताई खडसे -खेवलकर ,उपाध्यक्ष मा.नारायण दादा चौधरी ,सचिव मा. डॉ.दादासाहेब सी.एस . चौधरी ,प्राचार्य मा. डॉ. प्रो.एच ए महाजन ,उपप्राचार्य डॉ.ए. पी. पाटील ,सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments