बापरे... तब्बल १ कोटीला गंडवले सोलापूर मधून चौघांना सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या अहिल्यानगर प्रतिनिधी:- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) तब...
बापरे... तब्बल १ कोटीला गंडवले सोलापूर मधून चौघांना सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अहिल्यानगर प्रतिनिधी:-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
तब्बल १ कोटी १० लाख ८० हजारांची फसवणूक करणाऱ्या चौघांना सोलापूर जिल्ह्यातून अटक करण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून वीस ते तीस टक्के अधिक नफा मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन करून १ कोटी १० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.या बाबत सायबर पोलीस ठाण्यात प्रवीण दत्तू लोंढे, शिवाजी साहेबराव साळुंके, सागर उर्फ केशव धनंजय कुलकर्णी, महावीर दिगंबर कांबळे (सर्व रा.सोलापूर जिल्हा) यांच्यावर सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंद्राम,पोसई/ योगेश चाहेर,पोहेकॉ/ योगेश गोसावी,पोहेकॉ/ अभिजीत आरकल,राहुल हुसळे,नीलकंठ कारखेले,दिपाली घोडके,सविता खताळ,प्रीतम गायकवाड यांनी केले आहे.

No comments