पाझर तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत व निकृष्ट दर्जाचे.. त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) वृद्ध व जलसंधारण विभागाकडून मातीचा प...
पाझर तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत व निकृष्ट दर्जाचे..
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
वृद्ध व जलसंधारण विभागाकडून मातीचा पाझर तलाव बांधल्यावर पाझर तलावाच्या दोन्ही बाजूने बांधाला आतून बाहेरून दगडी पिचण करावी लागते करण्याचे फायदे बांधाची स्थिरता,मातीचे रक्षण, जलप्रवाहाचा नियंत्रण, दीर्घकालीन टिकाऊपणा,घसरण रोखणे,यासाठी पाझर तलावाच्या बांधाच्या आतून बाहेरून दगडी पिचण केली जाते. असे न करता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहोळी शिवारामध्ये २ वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मातीचा पाझर तलाव या तलावाला बांधाच्या दोन्ही बाजूने पिचन केलेली नाही त्यामुळे बांधावरची माती खचून चाललेली आहे
हे धरण केव्हाही फुटू शकतो आणि या पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे यामध्ये बांधावर पूर्ण मुरूम टाकण्यात आलेला आहे त्यामुळे हे तलाव लिकीज झालेले आहे त्यामुळे संबंधित अशा ठेकेदारावरती कारवाई करण्यात यावी असे गावातील नागरिकांची मागणी आहे जर कारवाई झाली नाही तर नाशिक येथे मृद व जलसंधारण ऑफिस येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.
,,प्रतिक्रिया,,
कोट्यावधी रुपये खर्च करून शेतकऱ्यांचा काहीच फायदा झालेला नाही या धरणाला आतून बाहेरून पिचन पण केलेली नाही धरणाच्या पूर्ण बांधाला वगळ पडलेले आहेत माती धुऊन गेलेली आहे धरण पावसाळ्यात फुटू शकते आणि या धरणाचे काम नित्कृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.
भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नाशिक जिल्हा चिटणीस




No comments