adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिर्डीत स्थानिक गुन्हे शाखेचे रात्रगस्त पेट्रोलिंग व कोम्बीग ऑपरेशन ३ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल

  शिर्डीत स्थानिक गुन्हे शाखेचे  रात्रगस्त पेट्रोलिंग व कोम्बीग ऑपरेशन ३ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल  अहिल्यानगर  (दि.४ प्रतिनिधी):- (संपादक ...

 शिर्डीत स्थानिक गुन्हे शाखेचे  रात्रगस्त पेट्रोलिंग व कोम्बीग ऑपरेशन ३ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल 


अहिल्यानगर  (दि.४ प्रतिनिधी):-

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

स्थानिक गुन्हे शाखेकडून शिर्डीत रात्रगस्त पेट्रोलिंग व  कोम्बीग ऑपरेशनचे आयोजन करून 

३ आरोपी विरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव शिर्डी शहरामध्ये सराईत गुन्हेगार तपासणी व कोम्बींग ऑपरेशन राबविणेबाबत आदेश दिले होते.  

नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात,पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, संतोष लोढे,गणेश भिंगारदे, सुरेश माळी,हदय घोडके,अमृत आढाव,प्रमोद जाधव,किशोर शिरसाठ,बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार,उमाकांत गावडे व अरूण मोरे अशांचे दोन पथक नेमुन त्यांना शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील रात्रगस्त पेट्रोलिंग व कोम्बीग ऑपरेशन राबविणेबाबत तसेच रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद मिळून येणाऱ्या व्यक्तीविरूध्द कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदशन करून पथकास रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि.०३ फेब्रुवारी २०२५ रोजी शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रगस्त पेट्रोलिंग व कोम्बीग ऑपरेशन राबविले.पथकाने राबविलेल्या ऑपरेशनमध्ये शिर्डी शहरामध्ये रात्रीच्या वेळी ३ इसम संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने,संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन  त्यांचेविरूध्द शिर्डी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.त्याची माहिती खालीलप्रमाणे  

अ. क्र.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे नाव दाखल केलेला गुन्हा

1)रोहित शिवाजी चाबुकस्वार, वय २३, रा.श्रीरामनगर, शिर्डी शिर्डी पोलीस स्टेशन गुरंन 55/25 मपोका 122

2)अभिषेक संतोष पोटे, वय २२, रा.श्रीरामनगर, शिर्डी शिर्डी पोलीस स्टेशन गुरनं 56/25 मपोकाक 122

3)रोहित बाळासाहेब धनवटे, वय २३, रा.नांदुर्खी रोड, शिर्डी शिर्डी पोलीस स्टेशन गुरनं 57/25, मपोकाक 122

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments