adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

व्यक्तिमत्व विकास अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन मूल्यांवर आधारित चोपडा तंत्रनिकेतनात व्याख्यान संपन्न

  व्यक्तिमत्व विकास अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन मूल्यांवर आधारित चोपडा तंत्रनिकेतनात व्याख्यान संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपा...

 व्यक्तिमत्व विकास अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन मूल्यांवर आधारित चोपडा तंत्रनिकेतनात व्याख्यान संपन्न


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी "महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित" श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजीनियरिंग & पॉलीटेक्निक) चोपडा येथे शिवव्याख्याते हभप. शिवश्री संजीव हिरामण सोनवणे गलवाडेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या असा मोलाचा संदेश दिला 

यावेळी हभप शिवव्याख्याते संजीव हिरामण सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं प्रसंगी त्यांनी महाराजांचे जीवन चरित्रावर आधारित बरेच प्रसंग विद्यार्थ्यांना सांगून आपण कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नये तसेच वेळेचा सदुपयोग करावा व आपल्या आयुष्यात काहीतरी एक ध्येय निश्चित करावं तसेच आई वडिलांची सेवा करा अशा पद्धतीचं अनमोल मार्गदर्शन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments