adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा सह.पतसंस्था फेडरेशनच्या व्हाइस चेअरमन पदी अश्विनी गुजराथी; प्रथमत: महिलेलामान

  जिल्हा सह.पतसंस्था फेडरेशनच्या व्हाइस चेअरमन पदी अश्विनी गुजराथी; प्रथमत: महिलेलामान चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा - ...

 जिल्हा सह.पतसंस्था फेडरेशनच्या व्हाइस चेअरमन पदी अश्विनी गुजराथी; प्रथमत: महिलेलामान


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा - १९८९ पासून झालेल्या जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन मर्या. जळगाव या संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी चोपडा येथील लक्ष्मी महिला पतसंस्थेच्या चेअरमन अश्विनी प्रसन्नकुमार गुजराथी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अश्विनी गुजराथी या भगिनी मंडळ संस्थेच्या सहसचिव म्हणून जबाबदारी सांभाळत असून त्यांनी यापूर्वी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून मैत्री व सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

           फेडरेशनच्या स्थापनेपासून पहिल्यांदा तालुकास्तरावरील महिलेला प्रथमत:च व्हाईस चेअरमन पदाचा मान मिळाला आहे. फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून पतसंस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येऊन पतसंस्थांचा एनपीए कमी करण्याचे कार्य करण्याला प्राधान्य देण्यात येते. फेडरेशनच्या चेअरमन पदी खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील शशिकांत भास्करराव साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर चोपडा तालुक्यातून मो.हनिफ हाजी अ. सत्तार हे दुसऱ्यांदा बिनविरोध संचालक निवडून आले आहेत.

No comments