adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सराईत आरोपीस तोफखाना पोलिसांनी केले गजाआड चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत

  सराईत आरोपीस तोफखाना पोलिसांनी केले गजाआड चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत   अहिल्यानगर (दि.२५ प्रतिनिधी):-  (संपादक-:- हेमकांत गायकवाड) अह...

 सराईत आरोपीस तोफखाना पोलिसांनी केले गजाआड चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत 


अहिल्यानगर (दि.२५ प्रतिनिधी):- 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर शहर व परिसरातून मोटर सायकल चोरी करणारा सराईत आरोपी किशोर जयसिंग पठारे (रा. पिंपळगाव माळवी ता.नगर,जि. अहिल्यानगर) यास पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले असून त्याच्या कडून २ लाख ४५ हजार रुपयांच्या ४ मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.हि कारवाई पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी केली आहे.तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार ताठे मळा पंपिंग स्टेशन येथे या सराईत आरोपीस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,सुनील शिरसाट, अहमद इनामदार,सुधीर खाडे, सुरज वाबळे,वसीम पठाण, सतीश त्रिभुवन,बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.

No comments