adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल आमदार जावळे यांच्या हस्ते दिपक पाटील यांनी लीहलेल्या , " छत्रपती शिवाजी राजे, दैवत... " आमुचे या हस्तलिखित पुस्तिकेचे प्रकाशन

  यावल आमदार जावळे यांच्या हस्ते दिपक पाटील यांनी लीहलेल्या , " छत्रपती शिवाजी राजे, दैवत... " आमुचे या हस्तलिखित पुस्तिकेचे प्रका...

 यावल आमदार जावळे यांच्या हस्ते दिपक पाटील यांनी लीहलेल्या , " छत्रपती शिवाजी राजे, दैवत... " आमुचे या हस्तलिखित पुस्तिकेचे प्रकाशन 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल शहरातील शिवाजी नगर येथे श्री.शिवाजी महाराज मित्र मंडळा वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम अयोजीत करण्यात आला होता यावल - रावेरचे आमदार अमोल जावळे यांचे हस्ते प्रथम श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण आला त्यानंतर सरस्वती विद्या मंदिर यावल येथिल कार्यरत  दिपक पाटील यांनी लीहलेल्या " छत्रपती शिवाजी राजे, दैवत... " आमुचे या हस्तलिखित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले . या आधी दिपक पाटील यांचे  पुस्तक व  साहित्य प्रकाशित झाले आहे.त्यांनी मुंजोबा देवस्थान व पद्मालय येथील गणपती  यांची महती सांगणारी व्हिडिओ सीडी निर्मिती केलेली आहे सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका व अध्यक्ष श्री.शिवाजी महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष मुकेश येवले सर उपस्थित होते तसेच जि.प.सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, अरुण कुलकर्णी , भगतसिंग पाटील, भाजप तालूकाध्यक्ष उमेश फेगडे, मां नगरसेवक राकेश कोलते, मनसेनेते चेतन अढळकर ,यावल शहर तालुक्यातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक व श्री. शिवजी महाराज मित्र मंडळाचे पदाधिकारी, उपस्थित होते. पुस्तिका प्रकाशन प्रसंगी आमदार साहेबांनी शिवरायांच्या जीवनावर गीत लेखन पुस्तिका बघून ,वाचून त्यांनी दिपक पाटील  यांचे कौतुक केले ..या  प्रकाशना साठी मुकेश येवले व श्री शिवाजी महाराज मित्र मंडळाचे सहकार्य लाभले . मोठ्या उत्साहात श्री शिवाजी महाराज प्रतिमा पूजन, व प्रकाशन कार्यक्रम पार पडला.. यावेळी आमदार अमोल जावळे व श्री मुकेश येवले, श्री दिपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .

No comments