न्हावी येथे लसिकरण द्वारे रोग निर्मूलन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रोगनिरीक्षण इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथे ...
न्हावी येथे लसिकरण द्वारे रोग निर्मूलन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रोगनिरीक्षण
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथे भारतात लसिकरण द्वारे रोग निर्मूलन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रोगनिरीक्षण आणि लासिकरण द्वारे निर्माण होणारी प्रतिकार शक्ती व रक्तातील प्रतीपिंडाचा अभ्यास करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील प्रा.आ. केंद्र हिंगोणा अंतर्गत आरोग्य उपकेंद्र न्हावी प्र. यावल ता. यावल येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर , डॉ. सी एच ओ डॉ रमेश धापते , व मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजु तडवी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी , वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल चौधरी , आरोग्य सहायक आसीफ मण्यार, आरोग्य सेवक स्वप्निल तायडे, आरोग्य सेविका श्रीमती पल्लवी भारंबे व आशा कार्यकर्ती यांचे सहकार्याने आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी न्हावी गावातील २ ते ४ वर्ष, ५ ते ९ वर्ष, १० ते१४ वर्ष वयोगटातील प्रत्येकी ७ असे एकूण २१ मुलांची पालकांची संमती घेवून मुलाखतीद्वारे व त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी शास्त्रज्ञ डॉ. प्रदिप सावंत , वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल जगताप, तांत्रिक सहायक हिमांशु जाधव, तांत्रिक सहायक प्रितम चौधरी राज्य आरोग्य प्रणाली संशोधन केंद्र, पुणे आणि आय सी एम आर- एन आय व्ही पुणे संशोधन संघ द्वारे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणीसाठी आलेल्या सदस्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांनी उपकेंद्राला भेट देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.
No comments