कुरवेल ता.चोपडा येथील युवा पिढी प्रगतीपथावर खलील तडवी बिडगाव ता.चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील तरुणा...
कुरवेल ता.चोपडा येथील युवा पिढी प्रगतीपथावर
खलील तडवी बिडगाव ता.चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील तरुणांनी शून्य पासून विश्व निर्माण कसे करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुरवेल गावातील तरुण, एकाच वर्षात सहा तरुणांनी शासकीय नोकरीत विविध ठिकाणी स्थान मिळवलेल्या मान्यवराचे स्वागत करण्यात आले यात दोन तरुण मुंबई पोलीस, म्हणून तर दोन तरुण होमगार्ड, एक तरुण पोस्ट खात्यात, तर एक तरुण लाल परी चा चालक, म्हणून नियुक्त मिळाली. विशेष म्हणजे हे सर्वच मुले अतिशय गरीब कुटुंबातील आहेत कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक सपोर्ट नसतानाही स्वतःच्या मेहनतीवर या तरुणांनी यशाचे शिखर गाठले आहे या तरुणांचा आदर्श येणाऱ्या पिढीने घ्यावा नवीन पिढीला प्रोत्साहन मिळावे यानिमित्ताने ग्रामस्थांनी सत्कार समारंभ ठेवला समारंभ ठिकाणी गावातील समस्त ज्येष्ठ मंडळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील कुरवेल गावाचे सरपंच सौ. उषाताई विसावे, माजी पोलिस पाटील, कुरवेल हायस्कुल कुरवेलचे चेअरमन प्रकाश दादा, हरी गुरुजी, राजु सर, गणेश सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे नियोजन रविंद्र कोळी व त्याचे सहकारी राजेंद्र कोळी, कैलास कोळी, विनोद पाटील, हिरु कोळी यांनी केले होते. गावात अशा प्रकारे पहिल्यांदाच कार्यक्रम घेण्यात आला यामुळे गावातील होतकरू मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल हीच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले
No comments