जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे वार्षिक स्नेह सम्मेलन सूजन-२०२५ उत्साहात इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) जे.टी. महाज...
जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे वार्षिक स्नेह सम्मेलन सूजन-२०२५ उत्साहात
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
जे.टी. महाजन पॉलिटेक्निक न्हावी मार्ग फैजपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन "सृजन २०२५ उत्साहात संपन्न झाले.सृजन २०२५ या वार्षिक स्नेह संम्मेलनात रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. त्या नंतर माजी विद्यार्थ्यांची मीटिंग संपन्न झाली . त्यात माजी विद्यार्थ्यांनी आपले पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संस्थेत घेतलेल्या शिक्षणाचा नोकरीच्या ठिकाणी कसा उपयोग होतो असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. नंतर सुजन २०२५ मध्ये झालेल्या विविध स्पर्धा व खेळ यांच्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य संपदान केले त्यांना संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, मानद सचिव विजय झोपे, मानद सहसचिव शशिकांत चौधरी, संचालक विजय परदेशी , प्रभाकर सरोदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभात पदक व पारितोषक देण्यात आले . नंतर मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी संचालक व कार्यक्रमाचे पाहुणे , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी यांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे वार्षिक स्नेहसंमेलन "सृजन २०२५ "हे संपन्न झाले.

No comments