मलकापूर येथे श्री राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती सोहळा उत्सवात साजरा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मलकापूर :- श्री राष्ट्र...
मलकापूर येथे श्री राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती सोहळा उत्सवात साजरा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मलकापूर :- श्री राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती ऊत्सव सोहळ २३ फेब्रुवारी रोजीं मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
श्री राष्ट्र संत गाडगेबाबा याच्या १४९ व्या जयंती सोहळ्या निमित्त राष्ट्र संत गाडगे महाराज परिट धोबी सेवा मंडळ शहर व तालुका मलकापूर याच्या वतीने विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते .
यामध्ये सकाळी ९ दिडी सोहळ्यास बस स्थानकापासून सुरुवात करून राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक, हनुमान चौक, येथून श्री गाडगे महाराजांच्या पुतळ्याजवळ दिंडीचा समारोप करण्यात आला. या दिंडी सोहळ्यात मुलींच्या भजनी मंडळांने टाळ वाजवीत सर्व शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. दिंडीमधील सहभागी पुरुषाचा महिलांना सुद्धा पावली खेळण्याचा मोह आवरला गेला नाही. दिंडीमध्ये सहभागी सर्वांना सकाळच्या सुमारास माजी नगरसेवक सुहास चवरे यांनी अल्पहार व चहाचे वाटप केले तर प्रहार संघटनेच्या वतीने अजय टप व पद अधिकारीआपली आवड संघटनेच्या वतीने आदित्य रावळ यांनी पाणी वाटप करण्यात आले.
राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज पुतळा चौक येथे मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर १०.३० वाजता साई आधार लॅब व मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा शाखा, यांच्यावतीने मोफत नेत्र व रक्त गट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक महेश भवन येथे आयोजित कार्यक्रमात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा शाल व सन्मानचित्र परीट (धोबी) समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी परीट समाज बांधवांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रसंत गाडगे महाराज परीट (धोबी) शहर व तालुका समाज सेवा मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.




No comments