राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल शार्दुल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश... त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जय...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल शार्दुल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश...
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.२३ फेब्रु रोजी हरसुल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल शार्दुल यांनी व आरीफभाई शेख यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथे मा.खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, ग्रामीण जिल्हा प्रमुख अनीलजी ढिकले, युवा जिल्हा प्रमुख सदानंद नवले, तालुका प्रमुख रविंद्र भोये, हरसुल शहर प्रमुख अशोक लांघे, पप्पू चौधरी,अक्षय मोरे, नारायण बदादे,सुलतान शेख, काशिनाथ बदादे,गोपाळ बदादे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments