adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण..

  माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.. नंदुरबार प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...

 माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण..


नंदुरबार प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकुम यांनी नंदुरबार रो ह यो वन क्षेत्रपाल यांच्या कडे माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत भांगडा सोनपाडा नर्सरी व ईतर कामाची माहिती मागितली असता वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्य जीव यांच्या कडे प्रथम अपील दाखल केले असता प्रथम अपीलीय अधिकारी यांनी अर्जदार यांना विना मुल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले. 


पण वन क्षेत्रपाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवली तसेच नंदुरबार रो ह यो मध्ये भांगडा सोनपाडा नियत क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे दाखविण्यात आले पण प्रत्यक्षात वन अधिकाऱ्यांनी याची बोगस बिले तयार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे व त्या बोगस बिलांचे रेकॉर्ड गायब करण्यात आले आहेत म्हणून ती माहिती देण्यास वन क्षेत्रपाल तयार नाहीत. 


तरी या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी वेळोवेळी उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांना लेखी व तोंडी कळविले परंतु उप वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार हे दोषी वन अधिकाऱ्यांना पाठिशी घालीत आहे असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकुम यांनी लावला आहे.


No comments