चोपडा तालुक्यातील विविध कंपन्यांचे १० टॉवर सील १० मोबाईल टॉवर सील... चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) अकृषीक कराची रक्कम न भरल्याम...
चोपडा तालुक्यातील विविध कंपन्यांचे १० टॉवर सील
१० मोबाईल टॉवर सील...
अकृषीक कराची रक्कम न भरल्यामुळे चोपडा तालुक्यातील विविध कंपन्यांचे १० टॉवर सील करण्यात आले...
मोबाईल टॉवर कंपन्यांना नियमानुसार नोटीस देऊन व सुचित करून देखील अकृषीक कराची रक्कम न भरल्यामुळे मोबाईल टॉवर सील करण्यात आले...
सील करण्यात आलेले टॉवर व अधिकारी याप्रमाणे-
अडावद २ टॉवर- अजय पावरा मंडळाधिकारी, विजेंद्र राजपूत तलाठी, संजय सैतवाल तलाठी,
हातेड २ टॉवर- आर बी माळी मंडळाधिकारी, ओमप्रकाश मटाले तलाठी, अमित चवरे तलाठी,
मामलदे १ - आर जे बेलदार मंडळाधिकारी, अमीन तडवी तलाठी,
आडगाव १ - विजय पाटील मंडळाधिकारी, जगदीश कापडे तलाठी,
वडती १ - एल बी हिंगे तलाठी,
मंगरूळ १ - अजय पावरा मंडळाधिकारी, पंकज बाविस्कर तलाठी, अनंता माळी तलाठी,
देवगाव १- इकबाल तडवी तलाठी,
धानोरा १- श्रीमती राजकन्या घायवट तलाठी
सन २०२४-२५ या वर्षासाठी चोपडा तहसील कार्यालयाला नेमून दिलेल्या उद्दिष्ट कृतीसाठी विविध स्त्रोत शोधण्यात आले असून अकृषीक आस्थापनांनी दरवर्षी संबंधित तलाठी यांच्याकडे अकृषिक कर भरणा करणे आवश्यक आहे...
चोपडा शहर, व्यापारी बाजारपेठा आठवडे बाजाराची ठिकाणी, मंडळ मुख्यालयाची गावे या ठिकाणी निवास व वाणिज्य प्रयोजनासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी बिगरशेती झालेल्या आहेत,
त्या जमिनीचे मालक व वापरकर्ते यांनी बिगर शेती कर भरणे आवश्यक आहे त्यामुळे संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क साधून शासनास देय रक्कम अदा करावी, असे आवाहन करण्यात येते...






No comments