अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आज तिरंगा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले चोपडा प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) ...
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आज तिरंगा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
चोपडा प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
शासकीय आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वस्तीगृह चोपडा यांच्या विविध समस्यांचे निराकरण झाले नाही म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आज तिरंगा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.मागणी करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे
१) मुलांचे वस्तीगृह माननीय गृहपाल एन एस खंबायत यांची बदली झाली पाहिजे.
२) मुलींचे वस्तीगृह गृहपाल सरडे मॅडम यांची सुद्धा गडचिरोली या ठिकाणी बदली करण्यात यावी
३) शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृह मंजूर झाले आहे ती जागेची ठिकाणी नाला आणि स्मशान भूमी असल्यामुळे त्या जागे व्यतिरिक्त शासकीय इमारत बांधण्यात यावे.
४) बीएस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांचे वस्तीगृहात प्रवेश देण्यात यावा.
५) वेले येथे इंग्रजी शाळेत मुलांना ढोरासारखे कोंडून घेऊन जातात जर यांना वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा व्यवस्था करत नसतील तर मुलांना दुसऱ्या शाळेत कन्व्हर्ट करायला पाहिजे नाहीतर शाळेची मान्यता रद्द करावी.
६) शासकीय आदिवासी वस्तीगृहाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे डीबीटी आणि स्कॉलरशिप लवकरात लवकर मिळाली पाहिजे.
७) जी एन एम आणि आर एन एम नर्सिंग विद्यार्थिनींना स्कॉलरशिप साठी व्हॅलिडीटी मागतात त्यामुळे विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे म्हणून
माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक
माननीय प्रकल्प अधिकारी यावल यांनी नर्सिंग करत असलेल्या विद्यार्थिनींना स्कॉलरशिप साठी व्हॅलिडीटी अट रद्द करण्यात यावी.
७) शासकीय आदिवासींची मुला मुलींचे वस्तीगृहात ५०० विद्यार्थिनी आणि ५०० मुलांचे संख्या वाढवण्यात यावी.
निवेदन देताना
आमचे मार्गदर्शक आणि सल्लागार एडवोकेट दारासिंग पावरा साहेब
रामचंद्र दादा भादले... (माजी पंचायत समिती सदस्य)
नामाभाऊ ...(अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष)
(एडवोकेट)..मा. संजय पाडवी
विजय मोरे ...(बी एस पी पार्टी शहर अध्यक्ष )
जया पावरा
सुहास पावरा
उमेश पावरा
सुरज पावरा
इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते
(संपूर्ण हॉस्टेलचे मुलं_ मुली)


No comments