आज पासून आडगाव ला श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरूवात चोपडा ( प्रतिनिधी) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा: - तालुक्या...
आज पासून आडगाव ला श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरूवात
चोपडा ( प्रतिनिधी)
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील आदर्श गाव आडगाव येथे सालाबादप्रमाणे यंदा देखील वसंत पंचमीपासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सुरू झाला आहे.
श्रीमद् भागवत कथा वाचक ह भ प कैलास जी महाराज ( चोपडाईकर) तालुका अमळनेर हे करीत असून वसंत पंचमीपासून दुपारी दोन ते पाच या वेळेत श्रीमद् भागवत कथा, आणि पाच वाजेनंतर हरिपाठ रात्री साडेआठ वाजता तारीख दोन रोजी श्रीराम महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले.
तारीख तीन रोजी पांडुरंग महाराज आवरकर, तारीख 4 रोजी ज्ञानेश्वर महाराज बेलदारवाडी कर), यांचे कीर्तन झाले. तारीख ५ रोजी जितेश महाराज (म्हसावदकर), ता.६ रोजी किशोर महाराज (तळवेलकर) ता.७ रोजी भाऊराव महाराज (मुक्ताईनगर कर) ता.८ रोजी लीलाधर महाराज चाळीसगावकर) ता.९ रोजी श्रीमद् भागवत कथा वाचक यांचे काल्याचे किर्तन होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आडगाव भजनी मंडळाने केले आहे.

No comments