मोटरसायकल सद्भावना रॅलीमध्ये मातंग समाजाने बहुसंख्येने व्हावे.... जगदीश मानवतकर ( उपाध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वाशिम.) वाशीम प...
मोटरसायकल सद्भावना रॅलीमध्ये मातंग समाजाने बहुसंख्येने व्हावे.... जगदीश मानवतकर ( उपाध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वाशिम.)
वाशीम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
स्थानिक वाशिम येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वाशिम च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या जयंतीच्या अनुषंगाने सकाळी ०६:०० वाजता जलाभिषेक, दीपस्तव व ध्वजारोहन होणार आहे . त्यानंतर जिजाऊ वंदना घेऊन जिजाऊंना नमन करायचे आहे. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता मोटरसायकल सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .
त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक , वाशिम येथे ठीक सकाळी ०९:०० वा. भव्य रक्तदान शिबिराचे आणि मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वाशिम च्या वतीने करण्यात आले आहे . वाशिम मधील मातंग समाजासह सर्व समाजाने यंदाच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित रहावे . असे आव्हान जगदीश मानवतकर ( मातंग समाज युवा नेते व उपाध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वाशिम २०२५ ) यांच्या वतीने करण्यात आली आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करून आपल्याला गुलामीतून मुक्त केले आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आज आपण स्वराज्याचे फळे चाखत आहोत , छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आपल्याला एकजूट होण्याची ताकद मिळाली, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती घेऊन हे स्वराज्य तयार केले होते, अनेक वीरांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळेच आपल्याला आज स्वतंत्र जगण्याचा आनंद मिळत आहे . ही गोष्ट मनी राखून आपल्याला यंदाच्या शिवजयंती मध्ये बहुसंख्येने उपस्थित राहायचे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जल्लोष करायचा आहे. वाशिम मधील मातंग समाजा सह जातीतील आणि धर्मातील समाजाने बहुसंख्येने शिवजयंतीच्या उत्सवामध्ये सामील व्हावे असे आव्हान जगदीश मानवतकर यांनी पत्रकार द्वारे वाशिम मधील मातंग समाजाचा सह सर्व जातीतील आणि धर्मातील समाजाला केले आहे.


No comments