चोपडा येथे प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही ऐतीहासीक शिवजन्मोत्सव सोहळा ..! पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती ची माहिती चोपडा प्रति...
चोपडा येथे प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही ऐतीहासीक शिवजन्मोत्सव सोहळा ..!
पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती ची माहिती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा :- शहरात मानाचा सार्वजनिक शिवजयंती सोहळा दि १८ व १९ फेब्रुवारी रोजी शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायं. ६ ते रात्री १० वा. दरम्यान साजरा होणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल गुरुदत्त वर आयोजित पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने माहिती दिली आहे.
सर्व धर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मीक कलागुणांच्या सहगुणांशी व ऐतीहासिक सादरीकरणाच्या उपक्रमांसह दिनांक १८ रोजी सायंकाळी ६ वाजता. "जाणता राजा नाटीका" व हिंदवी स्वराज्य स्थापना, शिवराज्याभिषेक सोहळा,शिव जन्मोत्सव साजरा होणार आहे. तसेच दि. १९ रोजी सकाळी ९ ते १० पर्यंत राजे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण सोहळा व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण तसेच सायंकाळी ५ ते ६ शिवशाहीर पोवाडा, जिजाऊ वंदना, महाराष्ट्र गित व शिव विचार जिजाऊ वंदना हे कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, व नागलवाडी माध्यमिक विद्यालय तसेच चिलाने येथील सुप्रसिद्ध अश्वनृत्य सादर करण्यात येणार आहे.
शिव कालीन प्राचीन वस्तूंचे प्रदर्शन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.प्रत्येक सहभागी संघास सादरीकरण झाल्यानंतर बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.तरी सर्व शिवप्रेमी, रसिक श्रोते चोपडा शहर व तालुकावासियांनी या महाउपक्रम सोहळ्याचे साक्षीदार होऊन आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन समिती कडून करण्यात आले आहे.

No comments